|
| 1 | न.प.हद्दीतील सर्व मालमत्तांचे नोंदणी करून प्रत्येक इमारत मालमत्तेचे घरोघरी जाऊन सविस्तर सर्व्हेक्षण करणे तसेच खुल्या भूखंडाचे सविस्तर सर्व्हेक्षण करणे, मालमत्तांचे मोजमाप करणे व माहिती गोळा करणे. |
| 2 | सर्व मालमत्तांना अद्वितीय ओळख क्रमांक देणे, विहित नमुन्यात सर्व आवश्यक माहिती गोळा करणे, प्रत्येक मालमत्तेचे खोलीनुसार चटई क्षेत्र बांधकाम क्षेत्र व भूखंड क्षेत्राचे गणना करणे, प्रत्येक इमारत मालमत्तेचे बांधकामाचे मजल्यानुसार चटईक्षेत्र बांधकाम क्षेत्र भूखंड क्षेत्र दर्शवून, त्यात प्रत्येक खोली दर्शवून ऑटोकॅड च्या सहाय्याने संगणकीकृत नकाशे तयार करणे, प्रत्येक मालमत्तेचे डिजिटल फोटो काढणे, मालमत्तांचे सर्व्हेक्षणाचे संगणकीकृत केस पेपर फोटो व नकाशा मुद्रित करून जुन्या व नवीन मालमत्तेच्या माहिती सह तयार करणे, शहराचा हद्दीचा नकाशा तयार करून दिजिटाइज्ड करून व्यापारी क्षेत्र, उच्च राहवासी क्षेत्र मध्यम रहवासी क्षेत्र, निम्न रहवासी क्षेत्र या प्रमाणे विभागणी करून झोन व करांकृत नकाशा तयार करणे सर्व काम संगणकीकृत करणे. |
| 3 | करमुल्य निर्धारण तसेच भांडवली मुल्य निर्धारण या द्विपद्धतीय कर आकारणी करणे, डिमांड तयार करणे, नोटीस तयार करणे, ऑनलाईन आक्षेप नोंदविणे, कराचे बिल तयार करणे, ही सर्व कामे करण्याकरिता स्वयंचलित कर आकारणी आज्ञावली विकसित करून पुरविणे व कार्यान्वित करणे. |
| 4 | सर्व्हेक्षणात प्राप्त झालेली सर्व माहितीच्या आधारे, निर्धारित दरावरून मालमत्तेचे करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्याची गणना करण्यास सहकार्य करणे, निर्धारित दरानुसार कर आकारणी करण्यास सहकार्य करणे, विशेष नोटीस तयार करणे, असेसमेंट रजिस्टर तयार करणे, कराचे बिल तयार करणे, प्राथमिक कर आकारणी यादी तयार करणे, सर्व समावेशक करमुल्यांकनाची वैयक्तिक प्रकरणे तयार करून सुनावणी नोटीस व आदेश पत्र तयार करणे, वैयक्तिक मालमत्ता धारकास तामील करण्याकरितानोटीस तयार करणे, मालमत्तेची आलेली हरकतीवर देण्यात येणारी सुनावणी नंतर त्यावर देण्यात आलेला निर्णय रजिस्टर वर नोंदविणे, सुनावणीस सहकार्य करून आवश्यक बदलांसह अंतिम करमुल्यांकनाची यादी तयार करणे या सर्व कामात नगर परिषदेस सहकार्य करणे. |
| 5 | कर मुल्यांकनाची प्रक्रियेच्या संपूर्ण माहितीचा संगणकीकृत डाटाबेस तयार करणे, व प्रत्येक मालमत्तेची सर्व माहिती संगणकीकृत करून फोटो व नकाशासह सर्व मालमत्ता विवरण व करमुल्य गणना विवरण तक्ता तयार करणे, सर्व संबंधित माहिती एका क्लिक वर उपलब्ध होणे, ऑनलाईन कर वसुली करिता ऑनलाईन पेमेंट गेटवे विकसित करून जोडणे, ऑनलाईन झालेल्या व्यवहाराचे जलदरीत्या अहवाल जनरेट करणे, करमुल्य निर्धारण तसेच भांडवली मुल्य निर्धारण या द्विपद्धतीय कर आकारणी करणे हि सर्व कामे करण्याकरिता स्वयंचलित कर आकारणी आज्ञावली विकसित करून पुरविणे व कार्यान्वित करणे. |
| 6 | मालमत्ता कर विभागासाठी CFC (ग्राहक सुविधा केंद्र) म्युनिसिपल काउंटर पेमेंटचे संगणकीकरण:- ऑनलाइन मालमत्ता कर भरण्यासाठी आणि मालमत्ता कर विभागाचा डेटा लिंक करण्यासाठी नगर परिषदच्या वेबसाइटवर त्वरित संदर्भासाठी ऑनलाइन मालमत्ता कर भरण्यासाठी वेब इंटरफेस अप्लिकेशनचापुरवठा करणे. अप्लिकेशन द्वारे मालमत्ता मालकाला संबंधित मालमत्ता नाव, मालमत्ता क्रमांक, क्षेत्र क्रमांक, प्लॉट क्रमांक याद्वारे शोधण्याची आणि कर विभागाच्या मुख्य फ्रेम सॉफ्टवेअर अॅप्लिकेशनमधून लिंक अपडेट माहिती आणि मालमत्ता डेटा पाहण्याची परवानगी असली पाहिजे. 1. व्हिसा, मास्टरकार्ड, क्रेडिट कार्ड, भारत बिल पेमेंट सिस्टम, वॉलेट पेमेंट, पीओएस मशीन इंटिग्रेशन 2. डेबिट कार्ड्स 3. ऑनलाइन नेट बँकिंग खाती किंवा 4. कॅश कार्ड, या पैकी कोणतीही पद्धत वापरून पेमेंट करण्याची सुविधा असणे. व त्या द्वारे पावत्या तयार करणे, एसएमएस आणि ईमेल अलर्ट ची सुविधा असणे. मालमत्ता कराच्या ई-पेमेंटसाठी विकसित केलेल्या वेब ऍप्लिकेशनसह ऑनलाइन पेमेंट गेटवे एकत्रित करणे. |
| 7 | नगर परिषद कर विभागाकरिता विभागातील बिल लीपिकांच्या सुविधे करिता (अँड्राईड बिलिंग सिस्टीम) अँड्राईड मोबाईल/टॅबलेटआधारित मालमत्ता कर वसुलीस सुसंगत अशी कर वसुली आज्ञावली कर पावती तयार होणे व प्रिंटींग होणे तसेच आवश्यक नमुन्यात मालमत्ता दैनिक कर वसुली अहवाल काढता येण्याच्या सुविधेसह पुरविणे. |
| 8 | नगर परिषद मालमत्ता कर वसुली करण्याकरिता (अँड्राईड बिलिंग सिस्टीम) अँड्राईड मोबाईल/टॅबलेट डीवाईस व ब्लूटूथ प्रिंटर इ. पुरविणे व नगर परिषद कर विभागातील कर लिपिकांना प्रशिक्षण देणे. (अँड्राईड मोबाईल/टॅबलेट डीवाईस व ब्लूटूथ प्रिंटर एकत्र) |
| 9 | नगर परिषदेस संपूर्ण अपिल प्रक्रिया (कलम १६९ व १७० नुसार) या कार्यात सहकार्य करणे, अपील सुनावणी, पुन्हा मोक्का तपासणी, करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्य दुरुस्ती करून अद्यावत करणे, कर आकारणी, कराची मागणी दुरुस्ती, डाटा एन्ट्री करणे, दस्तेवज पुन्हा प्रिंट करणे, आणि सुनावणी नंतर पोस्टिंग करणे, अंतिम मागणी बिल तयार करून आवश्यक स्टेशनरी सह पुरविणे, मागणी रजिस्टर बाईंडिंग करून पुरविणे. |
| 10 | नगर परिषद कर विभागातील संपूर्ण थकबाकी व वसुलीचे संगणकात भरणा करणे, बिल पोस्टिंग करणे, पावती पोस्टिंग करणे, वार्षिक मागणी देयके, मागणी रजिस्टर तयार करणेवपुरवठा करणे व संगणक आज्ञावली देखभाल दुरुस्ती करणे (Annual Maintenance Contract) (पुढील ४ वर्षांकरिता). |