|
| 1 | नगरपरिषदहद्दीचा भौगोलिक नकाश तयार करण्याकरीता नगरपरिषदहद्दीमध्ये UAV Drone उडवून मालमत्तांचे व जमिनीचे हवाई छायाचित्र काढून नगरपरिषदहद्दीचा भौगोलिक नकाशा तयार करून देण्यात यावा, नकाशावर नगरपरिषद ची हद्द आखणी, कर विभागाकरिता प्रभागाची आखणी नकाशावर करुन देण्यात यावी,राहाता शहरातील मालमत्तांचे GIS सर्वेक्षण करणे, प्रत्येक मिळकतीला क्रमांकन करण्याकरिता प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीला विशिष्ठ क्रमांक देण्यात यावा, मिळकतीमध्ये ज्या मिळकती सर्वजनिकवापर, करमुक्त मिळकती, शासकिय, निम शासकिय, औद्योगिक, निवासी व अनिवासी इ. मिळकतीना सुद्धा क्रमांकन करण्यात यावे, क्रमांकन करतांना मिळकतीची जुन्या व नविन मिळकतीची नोंदवही तयार करणे व प्रत्येक मिळकतींना नव्याने क्रमांकन करण्यात यावे,नविन नंबरची आखणी भौगोलिक नकाशावर करून प्रभाग दर्शक नकाशा व संपुर्ण शहराचा नकाशा तयार करून नगरपरिषदेस सुपूर्द करणे, निवड करण्यात आलेल्या निविदा धारकामार्फत नगरपरिषद ला आवश्यक असलेला इतर माहिती जसे सोलार सुविधा, रेन वॉटर हार्वेस्टिंग सुविधा, लिफ्ट बाबत माहिती, विहिर, हातपंप, अग्नि सुरक्षा सुविधासंबंधीत माहिती ,नगरपरिषदमधील कर विभाग प्रमुख यांच्या साह्याने नगरपरिषदहद्दितिल उच्च भाडे क्षेत्र, मध्यम भाडे क्षेत्र, कमी भाड्याचे क्षेत्र ची आखणी नकाशावर करणे इ. |
| 2 | नगरपरिषदहद्दीतिल मिळकतीचे (इमारती व खुले भुखंड) पारंपारिक पद्धतीने प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षण करण्याकरिता नगरपरिषद ेससहाय्य करण्यात यावे,मा. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या निर्देश व नियमांनुसार निविदा धारकांनी सामाजिक, आर्थिक सिमांकन, उच्चभाडे क्षेत्र, मध्यम भाडे क्षेत्र, कमी भाडे क्षेत्र, वाणिज्यीक, निवासी, झोपडपट्टी इत्यादीच्या आकलनाने नगरपरिषदहद्दीतिल मिळकती (इमारती व खुले भुखंड) जुन्या व नविन मिळकतीचे प्रत्यक्ष स्थळावर जाऊन मिळकतीचेमोजमाप घेऊन मिळकतीचा अंतर्गत नकाशा तयार करणे, सर्वेक्षणामध्ये मोजमाप हे चौ.फुट/चौ.मी मध्ये घेणे, सर्वेक्षण करतांना करमुल्यांकनाकरिता आवश्यक असलेली माहिती गट नंबर/स.नं.,इमारतीचे मजले, बांधकाम वर्ष, बांधकामाची रचना, बांधकामाचे क्षेत्र, करपात्र क्षेत्र,शौचालय शिट संख्या इ. माहिती गोळा करणे व प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षणाचे विवरण पत्र तयार करणे, प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीचे डीजिटल फोटो काढणे. |
| 3 | नगरपरिषेदेकडे कर विभागासंबंधित उपलब्ध असलेल्या माहितीचे अद्यावतीकरण करणे, करआकारणी करण्याकरीता नगरपरिषदेने निश्चित केलेल्या वार्डाप्रमाणे व मिळकतीप्रमाणे आज्ञावली अद्यावत करणे करमुल्यांकनाच्या प्रक्रीयेकरिता निविदाधारकाच्या सहाय्याने करण्यात आलेल्या मालमत्ता सर्वेक्षणाचा डाटा मिळकतीचे मजले, बांधकाम वर्ष, वापर, बांधकाम क्षेत्रफळ, करपात्र क्षेत्रफळ, खुल्या भुखंडाचे क्षेत्रफळ इत्यादी माहिती संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, नगरपरिषद ेद्वारे करमुल्यांकनाकरिता दरपत्रक किंवा भांडवलीमुल्य आकारणी करीता मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल. याप्रमाणे करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्य पद्धत या दोपैकी जी नगरपरिषद सुचविल त्याप्रमाणे आकारणी करणे गरजेचे आहे. करमुल्यांकनाच्या कामाकरीता निविदादारामार्फत संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण झाल्यानंतर मा.मुख्याधिकारी ने सुचविल्याप्रमाणे व नियमाप्रमाणे प्रत्येक मिळकतींची मिळकत कर आकारणी पत्रक डिजिटल मिळकतीचा नकाशा, मिळकतींचा फोटोसह कलर प्रिंट काढुन नगरपरिषद ला सुपुर्द करणे,नगरपरिषद ने सुचविलेल्या नमुन्यामध्ये प्रारुप कर मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल, नगरपरिषदेनेदिलेल्या नमुन्यामध्ये मिळकत धारकांना सुधारित करमुल्यांकनाबाबत पुर्वसुचना नोटीसेस कलर मध्ये पुरविण्यात येईल.सुनावणीकरिता मिळकत धारकाव्दारे घेण्यात आलेल्या नविन सुधारित करमुल्यांकनाबाबत आक्षेप अर्ज नोंदवही तयार करणे, सुनावनीस मिळकत धारकास आमंत्रित करण्याची नोटीस प्रिंट करुन देणे इत्यादी साहीत्य पुरवठा आवश्यक स्टेशनरी व बाईंडींगसह करणे. सुनावनी मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करुन नगरपरिषद ने दिलेल्या नमुन्यामध्ये अंतिम करमुल्यांकन यादी नगरपरिषद ला आवश्यक स्टेशनरीसह पुरविण्यात यावी. १. नगरपरिषदेतर्फे मालमत्ता करमूल्यांकनाची प्रारूप यादी प्रसिद्ध केल्यानंतर, मालमत्ता धारकांना त्यांच्या मालमत्तेचे अद्ययावत करमूल्यांकनाची सूचना नोटिसेस वाटप करण्यास मदत करणे. या नोटिसेसमध्ये मालमत्तेचा तपशील, नवीन करमूल्यांकन आणि इतर महत्वाची माहिती असेल.२. जे मालमत्ता धारक नवीन करमूल्यांकनावर आक्षेप घेतील, त्यांचे आक्षेप नगरपरिषदेकडून स्वीकारले गेले असतील. अशा मालमत्ता धारकांना त्यांच्या आक्षेपावरील सुनावणीस उपस्थित राहण्याबाबत नोटिसेस वाटप करणे. या नोटिसेसमध्ये सुनावणीची तारीख, वेळ आणि स्थळ तसेच सादर करावयाच्या कागदपत्रांची माहिती असेल.३. मालमत्ता करमूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, नगरपरिषदेकडून प्रत्येक मालमत्ता धारकाला त्याच्या/तिच्या मालमत्तेवरील अंतिम मालमत्ता कराची रक्कम दर्शविणारी अंतिम मागणी देयके वाटप करणे. या देयकांमध्ये कराची रक्कम, भरण्याची मुदत आणि पद्धत इत्यादी तपशील असतील. किंवा निविदा धारका मार्फत नगर परिषद अंतर्गत मालमत्ता धारकांनाइतर कोणतेही नोटीस वाटप करणे. |
| 4 | IWBP संगणक प्रणाली मध्ये अंतीम अहवालाची Data Entry करणे |